बदलापुरात शिवसेनेकडून चीनी वस्तूंची होळी 
बदलापुरात शिवसेनेकडून चीनी वस्तूंची होळी 








बदलापूर : भारत-चीन सीमारेषेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापुरात शिरगााव शिवसेना शाखेसमोर  चीनी  वस्तूंची होळी करण्यात आली. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा फोटोही जाळण्यात आला.  बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागात माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत चीनी वस्तूंची होळी करण्यात आली. तसेच भारतीय लष्करी जवानांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक भारतीय नागरिकाने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन अविनाश मोरे यांनी केले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.