भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदतर्फे  आर्सेनिक अल्बम30 चे वाटप 

भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदतर्फे  आर्सेनिक अल्बम30 चे वाटप 


बदलापूर 


भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली यांच्या बदलापूर शहर शाखेच्या वतीने आज रोजी सोनिवली गाव आदिवासी पाडा ; बदलापूर कॉविड सेंटर च्या पुढे ;सोनिवली; बदलापूर (पच्छीम)येथे होमिओपॅथीक आर्सेनिक अल्बम30 या रोगप्रतिकारक गोळ्याचे कमीतकमी 150 कुटुंबियांना वाटप मुंबई प्रदेश अध्यक्ष  सतीश मोहन ताके यांच्या उपस्थितीत  करण्यात आले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात बदलापूर शहर महिला कार्यकारिणीने गोरगरीब कुटुंबातील मुलांना बिस्कीट व इतर खाउचे वाटप करुन उस्फुर्त सहभाग नोंदवला.बदलापूर शहर महिला शुभांगी महाजन यांनी खाऊचे आयोजन केले होते तर आर्सेनिक अल्बम 30 या औषधी गोळ्यांचे आयोजन बदलापूर शहर सचिव  शुभम पाटील यांनी केले होते व सर्व कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वी करन्यात सहकार्य केले .बदलापूर महिला शहर सचिव  मोहिनी रिकामे यांनी कार्यक्रम स्थळा बदल नियोजन करून अंबरनाथ तालुका अध्यक्ष सौ माया कांबळे यांनी मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम यशस्वी करते समयी मुंबई प्रदेश अध्यक्ष  सतीश मोहन ताके ;बदलापूर शहर सचिव  शुभम पाटील; अंबरनाथ महिला तालुका अध्यक्ष   माया कांबळे ;बदलापूर महिला शहर अध्यक्ष  शुभांगी महाजन ;बदलापूर महिला शहर सचिव श्रीमती मोहिनी रिकामे ;बदलापूर शहर महिला उपाध्यक्ष सुजाता कर्णिक हे पदाधिकारी उपस्थित होते .