बदलापुर - अबरनाथ निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर

बदलापूर :- एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणकांसाठी सधारित प्रभाग रचना. आरक्षण व सोडातीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर नगरपालिकासह राजगुरुनगर, भडगांव, वरणगाव, भोकर, मोवाड आणि वाडी या नगरपालिका निवडणूक संपन्न होणार आहे, निवडणूक आयोगाने अंबरनाथ बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने दोन्ही शहराच्या मिळून महापालिका होणार याचर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगर परिषदांच्या प्रभागांचे संख्या,त्यांची जिल्हाधिकारी प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीचे २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण सह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयक्तांकडे मख्याधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करायचे आहे, मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्त १५ फेब्रुवारीपर्यंत मान्यता देतील, त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडती करता जिल्हाधिकारी नोटीस प्रसिद्ध करतील, जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर १८ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या सदस्य पदांच्या ( अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील महिला नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रयोगातील महिला) आरक्षणाची सोडत काढतील. २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवरील वृत्तपत्रात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदेच्या वेबसाईटवर प्रारुप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षण अधिसूचना सदस्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच मागविनेकारिता प्रसिद्ध करतील. जिल्हाधिकारी यांच्या कडे प्राप्त झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी२९ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली अशा स्वरूपाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना, आरक्षण व सोडातीचा कार्यक्रम जाहीर केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ होणार आहे.